दोन मोटारसायकल चोरट्यांना बारामती पोलिसांकडून अटक

मिलिंद संगई
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

बारामती शहर - येथील शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याकडून पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी ही माहिती दिली.  

बारामती शहरात 8 ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालता म.ए.सो. शाळेबाहेरील रस्त्यावर पोलिस कर्मचारी डी.एन. डोईफोडे व एन.बी. जगताप यांना भरधाव वेगातील मोटारसायकल नंबरप्लेट न लावता दोघे घेऊन निघाले होते.  दोन्ही पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस ठाण्यात आणून दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. योगेश दिलीप देवकाते (रा. कण्हेरी, ता. बारामती) व कृष्णा श्रीमंत गंभीरे (रा. लाकडी, ता. इंदापूर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन, शहर हद्दीतील एक व आणखी एक अशा पाच गाड्या त्यांनी चोरल्या होत्या. या तपासात सहायक पोलिस निरिक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार डी.एन. सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश केकाण, आर.डी. साळुंके, डी.एन. डोईफोडे, आर.एस. गायकवाड, आर. आर. पांढरे, पी.बी. नाळे, व्ही.एस. वाघमोडे, ए.यू. जाधव, एस.एन. पाटील, जी.एम. नांदे, एन. बी. जगताप यांनी सहभाग घेतला. 

Web Title: Two motorcycle thieves arrested by the Baramati police