करिअरसाठी दोन पर्याय: करमणूक आणि अभ्यास

saomeshwarnagar.jpg
saomeshwarnagar.jpg

सोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा म्हणजे चार वर्ष कष्ट करायचे आणि आयुष्याची चाळीस वर्ष समाधानात जगायचे. पहिली करमणूक आणि अभ्यास दुय्यम हे सूत्र आयुष्य मातीत घालेल. '',असा इशारा करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी दिला.

येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, भारत ज्ञान विज्ञान समुदाय यांच्यावतीने व प्रिया, मायक्रो, श्री, ओंकार, हर्ष, यश, गणेश, समर्थ या एमकेसीएल केंद्रांच्या सहकार्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत 'एक दिवसीय करिअर मार्गदर्शन शिबीर' आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब माळशिकारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाज्ञाविस चे तालुकाध्यक्ष संदीप जगताप होते.  याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते, सचिव भारत खोमणे, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, प्राचार्य एस. के. हजारे, प्राचार्य धनंजय बनसोडे, डॉ. मनोहर कदम, जगन्नाथ लकडे, वाय. जी. चव्हाण, प्रा. अजय दरेकर उपस्थित होते.

नवले म्हणाले, ''सगळे जग आता भारतात आलय. आजही जगात भारतीय मुलेच काही करु शकतील असे आहेत. त्यामुळे न्यूनगंड बाळगू नये. आणि बॅंक बॅलन्ससाठी किंवा केवळ मिरवण्यासाठी करिअर नको. चांगल्या क्षेत्रात अजून स्पर्धा नाही. बारावीनंतर मुलांना एनडीएचा पर्याय असतो पण राज्यातील मुले कमी कारण अर्ज सुटल्यावर तयारी सुरू करतात. मेडिकल, इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या मुलांनाही सैन्यात 'आर्म फोर्स कंबाइन्ड सर्विसेस' मधून सैन्यात जाता येइल.''

अॅग्रिकल्चरल क्षेत्रातही विशेष संधी आहेत.  
सोमेश्वरचे संचालक महेश काकडे  यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम समन्वयक योगेश सोळसकर यांनी प्रस्ताविक केले. अझहर नदाफ यांनी सूत्रसंचालन केले तर आकाश सावळकर यांनी आभार मानले.

 करिअरची त्रिसूत्री 
आवड, क्षमता आणि पात्रता ही करिअरची त्रिसूत्री आहे. क्षेत्र आवडीचे नसेल तर त्यात जाऊन भार व्हाल. आवड असेल तर देहभान विसरून काम करु शकता आणि आनंद घेऊ शकता. आपल्या क्षमता बघून कुठल्या परीक्षा द्यायच्या ते ठरवावे, अनुकरणातून नव्हे. आणि त्या आवडत्या करिअरमध्ये जाण्यासाठी आवश्यक पात्रता मिळविण्याची जिद्द पाहिजे, असे गमक विजय नवले यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com