सरळगांव येथे अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी

नंदकिशोर मलबारी
सोमवार, 21 मे 2018

सरळगांव - कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील ओतून पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुरबाड तालुक्यातील 2 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

सरळगांव - कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील ओतून पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मुरबाड तालुक्यातील 2 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीमुसार, तळेगाव व फागणे येथील सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे दोघे आपल्या तिन  मित्रांबरोबर शिर्डी येथे फिरण्यासाठी गेले होते. फिरून ते पुन्हा आपल्या गावी येत असताना ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोळवाडी येथे आंळेफाट्याकडे जाणाऱ्या झायलो गाडीने देशमुख यांच्या स्वीफ्टडिझायरला जोरदार धडक दिली. या धडकेत सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत असलेले शाम शिवाजी देशमुख, रोशन चौधरी व प्रकाश संभाजी देशमुख हे गंभीर जखमी झाले. 

जखमींना तातडीने आंळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घोटी जवळील एस. एम. बीटी. (धामणगांव) या रूग्णालयात पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two people were killed and three seriously injured in a road accident