दोन संशयित व्यक्ती विलगीकरण कक्षात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

चीनसह काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. अशा बाधित देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या २५ हजार ७८२ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, प्रवाशांचे क्षेत्रीय सर्वेक्षणही सुरू आहे. कोरोना बाधित देशांमधून राज्यात आतापर्यंत १६७ प्रवासी आले आहेत. 

पुणे - कोरोना विषाणूंच्या संसर्गाची शक्‍यता असलेल्या दोन संशयित व्यक्तींना येथील डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनसह काही देशांमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. अशा बाधित देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या २५ हजार ७८२ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, प्रवाशांचे क्षेत्रीय सर्वेक्षणही सुरू आहे. कोरोना बाधित देशांमधून राज्यात आतापर्यंत १६७ प्रवासी आले आहेत. 

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत ३९ जणांना अशा प्रकारे दाखल केले आहे. यापैकी ३७ जणांचे कोरोनाची प्रयोगशाळेतील चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) आरोग्य खात्याला दिली. उर्वरित दोघांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल दोन दिवसांमध्ये येतील, असेही सांगण्यात आले.

#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३९ पैकी ३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या तीनपैकी दोन जण डॉ. नायडू रुग्णालयात तर, एक जण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये आहे.

कोरोनाबाबत पुण्यातील स्थिती...
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - १५
‘एनआयव्ही’ला पाठविलेले नमुने - १५
‘निगेटिव्ह’ आलेले नमुने - १४
विलगीकरण कक्षात दाखल व्यक्ती - २
सर्वेक्षणाखाली असलेले प्रवासी - ८१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two persons suspected of the possibility of Corona virus infection

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: