पुणे - मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. टीपू सुलतान फिरोज मसुरी (वय २४, रा. चंदननगर) आणि अनिरुद्ध अमरिश राठोड (वय २५, रा. वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदन जयप्रकाश सिंग (वय ३६, रा. वाघोली, मूळ रा. बिहार) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत चंदन यांचा भाऊ राहुल सिंग (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील लेबर कॅम्पजवळ ही घटना घडली होती. पुढील तपास करण्यासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.