लॉकडाऊनमध्ये तंबाखू विकणाऱ्याकडनं पोलिसांनी घेतला 'हप्ता' अन् मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money

त्यांनी दुकानाची झडती घेतली. तेव्हा त्यांना एका भरणीत तंबाखूच्या पुढ्या असल्याचे आढळून आले.

लॉकडाऊनमध्ये तंबाखू विकणाऱ्याकडनं पोलिसांनी घेतला 'हप्ता' अन् मग...

पुणे : तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदाराला कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून 2300 रुपये घेणाऱ्या दोन बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी निलंबनाचे आदेश दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलीस शिपाई हर्षल मांढरे व सागर सुर्यवंशी अशी निलंबित केलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. शहरात संचारबंदीमध्ये फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकलचा समावेश आहे. मात्र, २५ एप्रिल रोजी मांढरे व सूर्यवंशी हे कोंढवा पोलिस ठाण्यात नेमणुकीस असताना रात्र गस्तीवर होते. त्यावेळी ते खडी मशीन चौकातील एका किराणा दुकानावर गेले.

- Big Breaking : पुण्यात 71 हजार कुटुंबांचे होणार स्थलांतर; कोरोनाला रोखण्यासाठी नवी 'आयडिया'

त्यांनी दुकानाची झडती घेतली. तेव्हा त्यांना एका भरणीत तंबाखूच्या पुढ्या असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठांना कळवून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु दोघांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. तसेच, त्यांनी दुकानदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एका महिलेच्या माध्यमातून दुकानदारांकडून 2300 रुपये घेतले.  

- 'आता कायमचं घरीच थांबा'; कामावरून काढल्याचा आयटी कर्मचाऱ्यांना मेसेज!

याविषयी संबंधीत दुकानदाराने कोंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकानी चौकशी केल्यानंतर  दोघांनी पैसे घेतल्याचे दिसून आले. त्यांनी  चौकशी करून याबाबतचा अहवाल परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे पाठविला. त्यांनी दोघांना खुलासा करण्यास सांगूनही त्यांनी खुलासा केला नाही. त्यानंतर बावचे यांनी दोघांचे पोलिस खात्यातून निलंबन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Web Title: Two Policemen Suspended Who Recovered Installment Lockdown

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top