लोकलच्या दोन फेऱ्या शनिवारपर्यंत रद्द 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे : कामशेतजवळ देखभाल-दुरुस्तीसाठी 4 ते 7 जुलै दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दरम्यान पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलच्या दोन फेऱ्या रद्द केल्या आहेत तर, दोन लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

पुण्यावरून दुपारी सव्वाबारा वाजता सुटणारी आणि लोणावळ्याहून दुपारी दोन वाजून 50 मिनिटांनी सुटणारी लोकल चार दिवस रद्द केली आहे. तर, पुण्यावरून लोणावळ्याला दुपारी एक वाजता आणि दोन वाजता लोणावळ्याहून पुण्याला सुटणारी लोकल तळेगाव ते लोणावळ्यादरम्यान रद्द केली आहे. या दोन्ही गाड्या पुणे ते तळेगाव आणि तळेगाव ते पुणे दरम्यान धावेल, असेही मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Two rounds of local canceled till Saturday