पुणे : तिने केलीय काळी जादू सांगत मागविली सात लाखांची कबुतरे

सनील गाडेकर
Wednesday, 20 January 2021

तिने केलेल्या जादुटोणामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, अशी भिती दाखवून त्यावर उपचार करण्यासाठी सहा लाख 80 हजार रुपयांची चार कबुतरे खरेदी करावी लागतील, असे सांगत कोंढव्यातील एका कुटुंबाची दोन भोंदुबाबांनी फसवणूक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे ः घटस्फोट घेतलेल्या पतीवर त्यांच्या पत्नीने काळी जादू केली आहे. तिने केलेल्या जादुटोणामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, अशी भिती दाखवून त्यावर उपचार करण्यासाठी सहा लाख 80 हजार रुपयांची चार कबुतरे खरेदी करावी लागतील, असे सांगत कोंढव्यातील एका कुटुंबाची दोन भोंदुबाबांनी फसवणूक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी (रा. कोंढवा) व हकिमुद्दीन राज मालेगावंवाला (रा.कोंढवा खुर्द) या दोघांवर नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला (वय 36, रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरातमधील लुनवाडा येथील तमन्ना (नाव बदलले) नावाच्या मुलीसोबत लग्न झाले होते. परंतु पत्नीपासून मूल होत नसल्याने त्यांनी 2017 मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने घटस्फोट घेतला होता.

दरम्यान, चार महिन्यापूर्वी हुझेफा हा तापाच्या कारणामुळे आजारी पडला होता. त्याला कोरोना झाले असेल या शंकेने कुटुंबाने त्याची चाचणी करून घेतली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर वानवडीतील एका क्‍लिनिकमध्ये त्यावर किडनीचे उपचार करून तपासणी करण्यात आली. पण त्याचे अहवाल देखील निगेटिव्ह आले. परंतु त्याचा त्रास कमी होत नव्हता आणि त्याचे जेवण, पाणी पिणे खूप कमी झाले होते, त्यास वारंवार चक्कर येत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या रुग्णालयात त्याचे तपासण्या केले असतानाही त्याला नेमका त्रास कशाने होतो हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्याचे गोळ्या बंद करण्याचा सल्ला दिला होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तर घरातील इतरांनाही त्रास होईल ः
दरम्यान हुझेफा यांची तबियत बरी होण्यासाठी त्यांची आई व अबिझर यांची पत्नी एका धर्मगुरुला भेटले. त्यावेळी त्यांना तिथे हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यानंतर हकिमउद्दी एका माणसाला घेऊन हुझेफा याचे घरी गेला. त्याने मांत्रिक उपचार करून हुझेफा याचे पत्नीचा फोटो पाहण्यास मागून तो पाहत हुझेफाचे पत्नीने त्याचेवर काळी जादू केल्याचे सांगितले. तो मरणाचे दारात असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो. तसेच घरातील आणखी दोन लोकांना काळ्या जादूचा त्रास होऊ शकतो, असे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

तीन लाख मिळाले परत ः
काळ्या जादूच्या उपचारासाठी भोंदूबाबाने मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ती कबुतरे काळी जादूची बला त्यांच्या अंगावर घेतात. त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. संबंधित कुटुंबाने कबुतरांसाठी लागणारी रक्कम भोंदुबाबांना दिली होती. मात्र फसवणूक होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भोंदुबाबांकडे पैशाची मागणी केली. त्यातील केवळ तीन लाख रुपये परत करीत तीन लाख 80 हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two scoundrels arrested in pune