बस अपघातात दोन चिमुकल्या भगिणी ठार

प्रा. प्रशांत चवरे 
गुरुवार, 10 मे 2018

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज (ता.इंदापुर) येथे वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसच्या चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये गेली व पलटी झाली. या अपघातामध्ये दोन सख्या भगिणींचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात गुरुवारी (ता.10) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला. याबाबत दुर्गा दगडु सोनकांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

भिगवण - पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज (ता.इंदापुर) येथे वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसच्या चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये गेली व पलटी झाली. या अपघातामध्ये दोन सख्या भगिणींचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात गुरुवारी (ता.10) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला. याबाबत दुर्गा दगडु सोनकांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

चैताली दगडु सोनकांबळे (वय.08) व ऋतिका दगडू सोनकांबळे (वय.05, रा.आंबेडकर चौक खडकी, पुणे) असे अपघातांमध्ये मृत्युमूखी पडलेल्या सख्या भगिणींची नावे आहेत. रोहित राजेंद्र भोसले (वय.10) हा अपघातामध्ये गंभीर जखमी झाला असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहीती अशी की पटेल ट्रॅव्हल्स कंपनी पुणे यांची खासगी बस (एम.एच.42 के. क्यु. 4005) ही उमरग्याहुन पुण्याकडे निघाली होती. यामध्ये बसमध्ये असलेल्या चैताली व ऋतिका बसच्या बाहेर फेकल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक फरार झाला असून याबाबत अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकठ राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ऩाईक विलास मोरे करीत आहेत.

Web Title: two small sisters killed in bus accident