आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या करणारे दोघे अटकेत

आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या करणारे दोघे अटकेत

येरवडा : आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या व चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 84 ग्रॅमचे सोन्याचे दागिणे, 97 हजार रूपये रोख व एक अलिशान मोटार असा 18 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी शहरात तब्बल 88 गुन्हे केल्याचे उघड झाल्याची केल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद आक्कानवरू यांनी दिली.

आक्कानवरू म्हणाले, ‘‘आरोपी जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२ , रा. डिपी रस्ता, औंध) व नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय २५, रा. सर्वोद्य कॉलनी, मुंढवा) हे आरोपी सुट-बुटामध्ये अलिशान मोटारीतून येऊन दिवसा व रात्री घरफोड्या व चोऱ्या करीत होते. त्यांनी येरवडा पोलिसांनी अटक केले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरात तब्बल ८८ घरफोड्या व चोऱ्या केल्याचे कबुल केले. त्यापैकी येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा गुन्हे आहेत. ’’

आरोपींकडून 18 लाख 45 हजार रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिणे, एक अलिशान मोटार, 97 हजार रोख रकम हस्तगत केले. आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तपास येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, तपास पथकाचे उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलिस कर्मचारी अशोक गवळी, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, बाळासाहेब बहिरट यांनी तपास केला.

चोरीच्या पैशातून खरेदी केली आलिशान कार

पाकिटमार व घरफोड्या करणाऱ्यांची कारागृहात ओळख
जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा घरफोड्या करणारा तर नितीन जाधव हा पाकिटमार करीत होता. दोघांची येरवडा कारागृहात ओळख झाली. ते बाहेर पडल्यानंतर एकत्र घरफोड्या व चोऱ्या करू लागले. चोरीच्या पैशातून त्यांनी एक अलिशान मोटार खरेदी केली. त्यानंतर ते सुटाबुटात मोटारीने रात्रीच्या वेळी घरफोड्या तर दिवसा बसमध्ये पाकिटमार करायला जात असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com