esakal | पिंपरी-चिंचवड : दोन हजार कंत्राटी सफाई कामगारांना मिळणार न्याय

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन हजार सफाई कर्मचाऱ्यांना अखेर योग्य किमान वेतन मिळणार आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्तांनी कचऱ्याशी संबंधी काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना लागू केला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात साडेचार हजार रुपयांची वाढ झाली.

पिंपरी-चिंचवड : दोन हजार कंत्राटी सफाई कामगारांना मिळणार न्याय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन हजार सफाई कर्मचाऱ्यांना अखेर योग्य किमान वेतन मिळणार आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्तांनी कचऱ्याशी संबंधी काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना लागू केला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात साडेचार हजार रुपयांची वाढ झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत कागद-काच-पत्रा-कष्टकरी पंचायत (केकेपीकेपी) सातत्याने पाठपुरावा करीत होती. पंचायतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अनेकदा निवेदने दिली होती. मात्र, कामगार उपआयुक्त विकास पनवेलकर यांनी याविषयी स्पष्टीकरण देणारे जाहीर करताच प्रकरण निकालात निघाले. आतापर्यंत ‘स्वीपर्स व स्कॅवेन्जर्स’ या शीर्षकाखाली वेतन दिले जाणाऱ्या कचरा संकलन, रस्ता झाडणे व स्वच्छतागृहांची सफाई ही कामे करत असलेल्या दोन हजारपेक्षा अधिक कामगारांना याचा फायदा मिळणार आहे.

पुणे शहरात धावणार दोनशे मिडी बस

मात्र, चुकीचा किमान वेतन दर लागू केल्यामुळे निर्माण झालेल्या थकबाकीचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही, अशी माहिती केकेपीकेपीच्या सभासद विजया चव्हाण यांनी दिली.