पुण्यात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू    

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव, ता.गेवराई, जि.बीड) येथील असून सध्या (रा.चव्हाण कॉलनी, वडगाव, ता.मावळ)असे या युवकाचे नाव आहे.

सकाळी अकराच्या सुमारास पवार दुचाकी (क्रमांक एमएच 23 एएल 1085) वरून जात असताना 'नो एंट्री' मधून येणाऱ्या मल्टीअॅक्सल ट्रक (क्रमांक एमएच 06 बीडी 709) ने मागून दिलेल्या धडकेत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले, सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरले नव्हते.

पवार टाकवे येथील व्हॅराॅक पाॅलीमर्स कंपनीमध्ये मागील चार वर्षापासून काम करत होते. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगी आणि दोन भाऊ आहेत.

Web Title: Two-wheeler death in truck accident at Pune