बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

पराग जगताप
गुरुवार, 14 जून 2018

ओतूर (पुणे) : येथून जवळच असलेल्या अहिनवेवाडी सारणी मांदरणे या मार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकिस्वार तरुण जखमी झाला आहे.

हा बिबट्याचा हल्ला मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान अहिनवेवाडी व सारणी गावच्या मधील मार्गावर झाला असून, त्यात दुचाकी चालक निवृत्ती प्रेमा काळे (वय.30 रा.गोंदेवाडी) हा युवक जखमी झाला. त्याच्या पायाला जखम झाली असल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनरक्षक विशाल अडगळे यानी दिली.

मंगळवारी रात्री साडेनऊ दरम्यान याच मार्गावर बिबट्याने राहुल बरबडे व गजानन अहिनवे यांच्या दुचाकीवर झेप घेतली, मात्र झेप फसल्याने आणि दुचाकी पडल्याने बिबट्या पसार झाला त्याचे नशीब बलवत्तर म्हणुन दोघे बचावले.

मात्र त्यानंतर त्याच मार्गावरून रात्री अकरादरम्यान दुचाकीवरुन घरी चाललेल्या निवृत्ती काळे व अनिकेत जाधव यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला त्यात निवृत्ती काळे जखमी झाले, तर प्रसंगावधान राखत जाधव याने हातातील डबा भिरकावल्यामुळे बिबट्या पळाला. येथील नागरिकांनी वनविभागाला हल्ल्याची माहिती देऊन जखमी युवकास मदत केली.

तरी वनविभागाने या भागात पहाणी करुन त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी जखमी युवकास मदत करणारे स्वप्नील अहिनवे, निशांतअहिनवे, नामदेव जाधव, सचिन अहिनवे, संतोष गायकवाड, किशोर अहिनवे, गौतम पाडेकर व परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
 
Web Title: two wheeler driver injured in leopard sattack