झाडाची फांदी पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

चिखली - कृष्णानगर येथील हेच ते धोकादायक झाड.
चिखली - कृष्णानगर येथील हेच ते धोकादायक झाड.

चिखली - येथील कृष्णानगरमध्ये झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर एक पादचारी किरकोळ जखमी झाला. कस्तुरी मार्केटजवळ सोमवारी (ता. ९) दुपारी ही घटना घडली. 

रमेश उत्तम कारंडे (वय ५०, रा. कृष्णानगर, चिखली) हे यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या रस्त्यावरील झाडाच्या धोकादायक फांद्या काढण्याबाबत वारंवार विनंती अर्ज करूनही फांद्या न काढल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर नागरिकांनी पालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला. मात्र, सायंकाळपर्यंत एकही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळाकडे फिरकला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारंडे मुलाला शाळेतून आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्या वेळी झाडाची वाळलेली फांदी त्यांच्या डोक्‍यात पडली. जबर मार लागल्याने ते बेशुद्ध होऊन पडले. नागरिकांनी त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचदरम्यान तेथून जात असलेल्या एका पादचाऱ्यालाही फांदीचा मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. याबाबत स्थानिक रहिवासी श्रीधर पोटे म्हणाले, ‘‘झाड जुनाट झाल्याने ते ठिसूळ झाले आहे. पाऊस तसेच जोराचा वारा आल्यानंतर त्याच्या फांद्या पडल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत पालिकेकडे अनेकदा विनंती अर्ज करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे दुर्घटना घडली आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com