पुणे : धनकवडीत भरधाव वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

Two wheeler Rider died in accident in pune
Two wheeler Rider died in accident in pune

पुणे : धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता घडली. अपघाताच्या या घटनेनंतर वाहनचालक तेथून पसार झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

सत्यनारायण राजाराम ठाकर (वय ३७, रा.गुजरवाडी, कात्रज) असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ठाकर यांचे काका शिवाजी ठाकर (वय ६६,रा.धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ठाकर हे तीन दिवसांपूर्वी सकाळी साडे सहा वाजता सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागुन आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीस्वार ठाकर यांना धडक दिली. त्यामध्ये ठाकर हे गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने ठाकर यांना स्थानिक नागरीकांनी तत्काळ खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, या अपघातानंतर वाहनचालकाने ठाकर यांना उपचारासाठी मदत न करता तो तेथून पसार झाला.  या प्रकरणाचा तपास पोलिस  उपनिरीक्षक बी.एस.खेंगरे करीत  आहेत.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com