फेरीच्या बहाण्याने दुचाकी पळविली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - जुन्या दुचाकीच्या विक्रीसाठी ‘ओएलएक्‍स’वर जाहिरात केल्यानंतर दुचाकी विकत घेण्याचा बहाणा करून ‘टेस्ट ड्राइव्ह’साठी नेलेली दुचाकी घेऊन एकाने धूम ठोकली. ही घटना ९ डिसेंबरला कात्रज येथे घडली.

याबाबत सुबेंदु पाल (वय २४, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाल यांना दुचाकी विकायची होती. त्यासाठी एकाने संपर्क साधला. पाल यांनी दुचाकी पाहण्यासाठी कात्रज येथे बोलाविले. दोघांमध्ये ५० हजार रुपयांना दुचाकी विकण्याचे ठरले. आरोपीने फेरी मारण्यासाठी दुचाकी नेली. बराच वेळ होऊनही तो परतला नाही. फसवणूक लक्षात आल्यानंतर पाल यांनी फिर्याद दिली.

Web Title: Two Wheeler Theft Crime