पुणे : ओएलएक्‍सवरून खरेदी करताना दोन महिलांना असा बसला दणका; एवढ्या रुपयांना गंडा

Two women cheat 70 thousand rs from OLX in Pune
Two women cheat 70 thousand rs from OLX in Pune
Updated on

पुणे : ओएलएक्‍सवर वस्तु विक्री करणाऱ्या दोघांच्या बॅंक खात्यामधील तब्बल 70 हजार रुपये अनोळखी व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विश्रांतवाडी येथील दशरथनगर येथे राहणाऱ्या एका महिलेला घरातील डायनिंग टेबलची विक्री करायची होती. त्याबाबतची जाहीरात त्यांनी ओएलएक्‍सवर जाहिरात टाकली होती. संबंधीत जाहीरात पाहून एका अनोळकी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने डायनिंग टेबल घेण्यात रस असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी ठराविक रक्कम देण्याचे त्यांच्यामध्ये ठरले. दरम्यान, संबंधीत अनोळखी व्यक्तीने त्यांना डायनिंग टेबलसाठीचे पैसे गुगल-पे वरून पाठवतो असे सांगितले.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

फिर्यादींच्या मोबाईलमध्ये गुगल-पे नसल्याने आरोपीने त्यांना संबंधीत मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी ऍप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना त्यावर पैसे पाठविल्याचे सांगून संबंधीत लिंक उघडून त्यामध्ये माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी लिंक उघडून त्यावर पैसे प्राप्त झाले आहेत का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. याऊलट फिर्यादी यांच्या बॅंक खात्यामधून 50 हजार रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी काढून घेतली. या प्रकाराबाबत त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करुन विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला. 

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

दरम्यान, धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथेही याच पद्धतीची दुसरी घटना घडली. धानोरी येथे राहणाऱ्या एका महिलेने जुन्या फर्निचरची विक्री करण्यासाठी त्याबाबतची जाहीरात ओएलएक्‍सवर प्रसिद्ध केली होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही एक लिंक पाठविली. ही लिंक फिर्यादी यांनी उघडली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातुन पंधरा ते वीस हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com