esakal | pune : दोन महिलांकडून 20 हजार रुपयांची सोनसाखळी लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

pune : दोन महिलांकडून 20 हजार रुपयांची सोनसाखळी लंपास

pune : दोन महिलांकडून 20 हजार रुपयांची सोनसाखळी लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी सराफी दुकानातील 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरुन नेली. हि घटना 5 सप्टेंबरला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ओंकार तिखे यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन दोन अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील विकास मित्र मंडळ चौकाजवळ नगरकर गोल्ड अँड पल्स प्रा.लि. नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानामध्ये फिर्यादी हे कर्मचारी आहेत. 5 सप्टेंबरला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास दोन महिला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानामध्ये आल्या. त्यांनी सोन्याची साखळी व जोडवे खरेदीचा बहाणा केला. दुकानामध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा: खडकवासला धरण चौपाटीवर गर्दी; सिंहगडावर मात्र शुकशुकाट

गर्दीचा फायदा घेऊन व कर्मचारी तिखे यांचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी दुकानातील 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरली. त्यानंतर दोघीही काहीही खरेदी न करता तेथून बाहेर पडल्या. काही वेळानंतर तिखे यांनी सोन्याची साखळी ठेवलेल्या ट्रेची पाहणी केली, तेव्हा त्यांना सोन्याची साखळी निदर्शनास आली नाही. त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, तेव्हा त्यांना महिला चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले.

loading image
go to top