Pune News : पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षीय प्रिन्सचा मृत्यू; लोणी काळभोर येथील घटना

पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षीय बालक प्रिन्सचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एका ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
two year boy fell into water tank death loni kalbhor accident pune
two year boy fell into water tank death loni kalbhor accident puneSakal

Pune News : पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षीय बालक प्रिन्सचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एका ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिन्स चंद्रकुमार कोशले (वय २, रा. अष्टापूर मळा, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. बापू शिवराम माने (वय ४४, रा. साठे वस्ती, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील रायवाडी रस्त्यावरील गणेश खेडेकर यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. प्रिन्सचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत. याठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते.

परंतु टाकीवर झाकण बसविण्यात आले नव्हते. प्रिन्स खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला. त्यात तो बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस कर्मचारी विजय जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com