भुगाव येथे छापा टाकून केली मुलींची सुटका; दोन तरुणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

भुगाव (ता. मुळशी) येथे मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडून स्वतःची उपजीविका करणाऱ्या दोन तरुणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे.

कोळवण : भुगाव (ता. मुळशी) येथे मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडून स्वतःची उपजीविका करणाऱ्या दोन तरुणांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत रामदास पवार(वय २३) व प्रदिप मारुती खराडे(वय २४) असे युवकांचे नाव असुन तेथुन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

भूगाव परिसरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना मिळाली असता त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलिस शिपाई मयुर निंबाळकर, पोलिस शिपाई गणेश साळुंके,पोलिस शिपाई नामदेव मोरे  हे गोपनिय पथक सोबत घेउन सदर ठिकाणी गेले.

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय​

दरम्यान, तेथे जाऊन हे पथक दबा धरुन बसले. आरोपींच्या सर्व हालचालींची पाहणी करुन सदर फ्लॉटमध्ये जाऊन छापा घातला असता तेथे वेशा व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पौड पोलिसांनी अटक करुन मुलींची सुटका केली. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे करीत आहेत. पौड पोलिस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे व्यवसाय चालू असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths arrested for prostitution in Bhugaon