गाड्या जाळल्याप्रकरणी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : जुनी भांडणे असलेल्या एका तरुणावरील खुन्नस काढण्यासाठी आणि त्याच्यावर संशय यावा म्हणून दोघांनी आलिशान गाड्या जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. गाड्या जाळणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. धायरी येथील रायकर मळ्यामध्ये हा प्रकार घडला होता. 

या प्रकरणी हसन अब्दुल जमील शेख यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून श्रीकांत सतीश थोपटे (वय 25, रा. प्रयाग रेसिडेन्सी, धायरी) व अक्षय विष्णू मोरे (वर 22, रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांतचे अभिजित ऊर्फ बटऱ्या गाडे याच्याशी वाद होता. त्याच्यावर खुन्नस काढण्यासाठी व त्याच्यावर संशय यावा, यादृष्टीने दोघांनी शेख यांच्या मालकीच्या ऑडी व होंडा सिटी या दोन गाड्या गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळल्या होत्या. 

सीसीटीव्हीद्वारे तपास करताना श्रीकांत व अक्षय हे दोघे आढळून आले. हे दोघे रायकर मळ्याजवळील स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, गडकरी, पोलिस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, यशवंत ओंबासे, सुनील पवार, दयानंद तेलंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two youths under arrest for burning cars at Dhayri