MP Supriya Sule : मोरोपंतांच्या बारामतीत कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार अशोभनिय

'लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मत मांडण्याचा आणि प्रचार करण्याचा आधिकारी दिला आहे.
Tutari
Tutarisakal

माळेगाव - 'लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मत मांडण्याचा आणि प्रचार करण्याचा आधिकारी दिला आहे. परंतु बारामतीमध्ये अत्तापासूनच मत मांडणाऱ्या आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जाते, नोकऱ्यावरून काढून टाकण्याचे फोन केले जातात. विस्तविक विरोधक हा दिलदार असला पाहिजे, दडपशाही करणारा नको.

मोरोपंतांच्या सुसंस्कृत बारामतीमध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, हे मी सुरवातीलाच नम्रपणे सांगते, 'अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. याच वेळी सुळे यांनी कार्यकर्त्यांना धाडसाने पुढे या, मी तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभी असल्याचे आवर्जून सांगितले.

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे बौद्धनगर येथील समाज मंदीरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे जयपाल भोसले यांनी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या उद्धाटन प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

विशेषतः शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह दिले. त्यानंतर प्रथम आज सुप्रिया सुळे माळेगावात आल्या होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एस.एन. जगताप, अ‍ॅड. राजेंद्र काटे, उपाध्यक्ष अमित तावरे, संदीप गुजर, महिलाध्यक्षा वनिता बनकर, जयपाल भोसले, कार्य़ाध्यक्ष गौरव जाधव, प्रताप सातपुते, श्रीहरी येळे, भरत कदम, बाबाराजे पैठणकर, विजय भोसले, योगेश भोसले, प्रमोद जाधव आदी पादाधिकारी उपस्थित होते.

बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांना धमकावले जाते, नोकऱ्यावरून काढून टाकण्याचे फोन केले जातात, अशा प्रकारच्या तक्रारी सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तोच धागा पकडत सुळे यांनी माळेगावच्या संवाद मेळाव्यात विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. त्या म्हणाल्या, 'माझी लढाई ही दिल्लीमधील अदृष्य शक्तीविरुद्ध आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात सत्ताधारी नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभेची निवडणूक दिलदारपणे हातळावी. विरोधक हा दिलदार असला पाहिजे, दडपशाही करणारा नको. अर्थात हीच शिकवन कै. यशवंतराव चव्हाणांपासून अनेक थोर व्यक्तींनी घालून दिली आहे. बारामती ही कवी मोरोपंताची आहे. पवारसाहेबांच्या नावाने बारामतीला देशभर ओळखले जाते.

या तालुक्यात सुसंस्कृतपणाला बारामतीकरांची पसंती असते. त्यामुळे बारामतीत दमदाटीची भाषा कोणी करू नये आणि ती कोणी खपवूनही घेतली जाणार नाही. हे मी सुरवातीलाच नम्रपमे सांगते,' असा सबुरीचा सल्ला सुळे यांनी विरोधकांना दिला. याच वेळी उपस्थितांनी सुप्रियाताई... तुम आगे बडो, हम तुमारे पिझे आहे, अशा घोषणा देत पाटींबा दिला.

तुतारी.. भ्रष्ठ लोकांविरुद्ध आवाज उठविणार...

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याच ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून आपल्याला (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार) मिळाले आहे. त्यामुळे या तुतारी चिन्हाच्या माध्यमातून भ्रष्ठ लोकांविरुद्ध आवाज उठवायचा आहे, लोकसभेची निवडणूक जिंकायची आहे, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com