
Wheelchair Issues: अपंगांना सरकार दरबारी दिव्यांग म्हणून संबोधलं जातं, सामान्य नागरिकांनीही त्यांना दिव्यांग असंच म्हणावं असा आग्रही धरला जातो. पण अपंग असणं म्हणजे खरंच दिव्य अंग असणं असं आहे का? यामुळं या लोकांच्या दैनंदिन अडचणी दूर होतात का? किंवा सार्वजनिक सेवांमध्ये त्यांना प्राधान्य किंवा महत्व दिलं जातं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तर नाही अशी आहेत.
कारण पुण्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये एका उबर कंपनीच्या कॅब चालकानं एका व्हिलचेअरवरील अपंग महिलेला इच्छित स्थळी सोडण्यास नकार दिला. या उदाहरणाद्वारे आपल्यासारख्या लोकांसोबत कायमच कसा भेदभाव केला जातो, याचं वास्तव शेअर केलंय अपंगांसाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी विविध एनजीओजच्या माध्यमातून काम करणाऱ्या दिक्षा दिंडे यांनी.