Uday Samant : आमच्यात कोणताही वादविवाद नाही ; उद्योग मंत्री हे उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

“आमदारांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे आमच्या सर्व सहकारी आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली या रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला आहे. आमच्यात कोणताही वादविवाद नाही.
Uday Samant
Uday Samantsakal

खडकवासला : “आमदारांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे आमच्या सर्व सहकारी आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली या रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला आहे. आमच्यात कोणताही वादविवाद नाही. स्थानिक आमदार‌ (भीमराव‌ तापकीर यांच्याशी संपर्क साधूनच मी या ठिकाणी भूमिपूजनाला आलेलो आहे.” असे मत उद्योग मंत्री हे उदय सामंत यांनी व्यक्त केले.

कोल्हेवाडी व किरकटवाडी शिवरस्त्याचे कामाचे भुमिपुजन समारंभ उदय सामंत यांच्या हस्ते आज शनिवारी संध्याकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातुन अडीच कोटी रुपयेच्या कामाचे भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पीएमआरडीएचे संचालक रमेश कोंडे शहरप्रमुख निलेश गिरमे, नीलेश घारे उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामाला अद्याप महापालिकेची परवानगी नाही. तरी तुम्ही भूमिपूजन करीत आहात. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या परिसरातील नागरिकांच्या मागणी‌ होती. मागणी निम्मी पूर्ण केली आहे. उर्वरित कामासाठी देखील निधी देण्यात येईल. असेही सामंत यांनी सांगितले.

Uday Samant
Pune News : उपनगरांमध्ये अघोषित पाणीकपात ; पाणी सोडणाऱ्यांना सोसायट्यांकडून हवे लाखाचे ‘बक्षीस’

या कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर उपस्थित नव्हते. भारतीय जनता पार्टीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आमदार तापकीर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील लहुजी वस्ताद स्मारकांचे‌ एकत्रित उपस्थित असल्याने आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com