उदयनराजे हे सौरभ राव यांना चॉकलेट ऑफर करतात तेव्हा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे: पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून सौरभ राव यांनी आज सूत्रे घेतली. ही सूत्रे घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. मात्र, एका नेत्याच्या भेटीने आणि त्याने स्वागतासाठी दिलेल्या वस्तूने स्वतः राव हे देखील चकीत झाले. अर्थात ही व्यक्ती होती खासदार उदयनराजे.

उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये पुणे महापालिकेत एंट्री केली. थेट आयुक्तांचे दालन गाठले. राव यांना शुभेच्छा दिल्या. आधी पुष्पगुच्छ दिला. नंतर कॅडबरी डेअरी मिल्क चॉलकेट राव यांच्या हातात देत "इटस्‌ माय स्टाइल,' असे आपल्या शैलीत सांगितले. "माझं तुमच्याकडं काम नाही. पण तुम्ही चांगले अधिकारी आहात. पुणे जिल्हा उत्तम सांभाळला. आता पुण्यातही चमकदार कामगिरी करा,' अशा भरभरून शुभेच्छा उदयनराजे यांनी दिल्या.

राव यांनाही डेअरी मिल्क चॉकलेट आवडत असल्याचे राजेंना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी ते आवर्जून भेट दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी असल्यापासूनच राव यांच्याशी त्यांचा परिचय झाला होता. हटके भेट देऊन आणि आपली छाप उमटवून उदयनराजे पालिकेतून निघून गेले. राव यांच्या स्वागतासाठी पालिकेत आज बरीच गर्दी झाली होती. त्यात चर्चा झाली ती राजेंच्या भेटीची.

Web Title: udayanraje bhosale wish Commissioner of Pune Municipal Corporation saurabh rao