पवार, ठाकरे, फडणवीस आणि राज्यपाल आज एकाच मंचावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politicians
ठाकरे, फडणवीस, पवार आणि राज्यपाल उद्या एकाच मंचावर

पवार, ठाकरे, फडणवीस आणि राज्यपाल आज एकाच मंचावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) सोमवारी (ता.१४) पुण्यात एकाच मंचावर येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या (Savitribai Phule Statue) उद्घाटन कार्यक्रमात हे सर्व नेते दिग्गज मंचावर येणार आहेत. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठातील मुख्य इमारती समोर सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याचे काम आता पूर्ण झाले असून, परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरापूर्वीच सावित्रीबाईंच्या जन्मदिनी ३ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण प्रस्तावित होते. मात्र, राज्यपालांची वेळ घेण्यासाठी उशीर झाल्याने उद्‍घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करत जयंती दिनीच उद्‍घाटन करण्याची मागणी लावून धरली होती.

हेही वाचा: पुणे | सहा दिवसांच्या मुलाला ताम्हिणी घाटात फेकलं, शोध सुरू

पाच राज्यांतील निवडणुका आणि भाजप-सेनेचे राजकीय वार-पलटवार यामुळे धुरीणांचे एकाच व्यासपीठ येणे विशेष मानले जात आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन आणि त्यानंतर निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत क्रीडांगणावरील इनडोअर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

पुणे शहरात हे सर्व राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर येण्याची पहिलीच वेळ असावी. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात ते ही विद्यापीठात कुलपतींच्या उपस्थितीत हे राजकीय धुरीण काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uddhav Thackeray Devendra Fadnavis Ajit Pawar And Bhagat Singh Koshyari On One Stage In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top