मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीत; कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीचा पहिलाच दौरा आहे. अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  मोठ्या दिमाखात पार पडले.

बारामती : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीचा पहिलाच दौरा आहे. अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  मोठ्या दिमाखात पार पडले.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक कारमधून येथील प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हा मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच बारामती दौरा असल्याने सर्वांचे ते काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख  राजेंद्र पवार यांनी दिली.

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, प्रक्रिया उद्योग, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञानातील कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ, अतिवृष्ठीशी बळिराजा जिद्दीने लढतो आहे. या लढाईत साथ देण्यासाठी कृषिक २०२० कडून बारामतीत भरविल्या जात असलेल्या कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे आहे. १९ जानेवारीपर्यंच चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवळी उदंड प्रतिसाद मिळाला.

उद्धव ठाकरे तुमच्या नेत्यांना आवरा नाहीतर... : मराठा क्रांती मोर्चा

कृषी विज्ञान केंद्राने खास तुमच्यासाठी कृषि ज्ञान-तंत्रज्ञानाचा हा यज्ञ भरवला आहे. अतिशय चांगले प्रदर्शन आहे. नवनविन तंत्रज्ञान पाहा. आत्मसात करा. कंपन्यांनी आवजारे तयार केली आहेत. ती फक्त पाहू नका, त्यात सुधारणा आवश्यक असतील तर सूचना करा. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचे सर्वात मोठे आकर्षण बनले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray for the first time as Chief Minister; Inauguration of Agricultural Exhibition