esakal | उध्दव ठाकरे यांच्यात भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay Raut

उध्दव ठाकरे यांच्यात भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे काम अतीशय चांगल्या पध्दतीने चालु असुन भविष्यात त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची कार्यक्षमता आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांणी आळेफाटा या ठिकाणी केले.

जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आळेफाटा (ता.जुन्नर)या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख व तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे,जुन्नर तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे,उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, जुन्नर नगर परीषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे,जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके,नयना डोके,विश्वास आमले, कृषी उत्पन्न बाजार समितचेउ पाध्यक्ष दिलीप डुंबरे ,पंचायत समीतीचे सदस्य जिवन शिंदे,नेताजी डोके, संभाजी तांबे,दिलीप ढमढेरे,मंगेश काकडे,भास्कर गाडगे ,नारायणगावचे सरपंच बाबु पाटे,आनंद चासकर,दत्ता शिंदे आदी मान्यवर व शिवसेनेचे तालुक्यातील पदाथिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे: दुसऱ्या फेरीतील ‘कट- ऑफ’ देखील नव्वदीपार

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्याचेच सरकार आणि ते ठाकरे सरकार आहे. त्यामुळे तीन वर्षे अजुन बाकी आहेत आपन जे गमावले ते कमवा, जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे ते कमी होत नसुन राज्यात ५५ ठिकाणी भगवा फड़कला पण जुन्नरला फड़कायला हवा तिथ नाही फडकला ती खंत आम्हाला आहे .तसेच शिवसेना हे एक मंदिर आहे डोक्यात राग घालुन जायचे आणि परत यायचे असे करू नका आपले एकच कुटुंब आहे जो शिवसेनेतून गेला तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो जी बोचकी बाहेर गेली ती परत आली तरी परत घ्यायची नाहीत.

हेही वाचा: एकनाथ खडसेंसह कुटुंबियांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; पाहा व्हिडिओ

यावेळी मिर्लेकर म्हणाले की भविष्यात जुन्नर चा आमदार हा शिवसेनेचाच असेल या साठी शिवसैनिकांणी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले .तसेच अनेकांना शिवसेनेने मोठे केले आहे त्यांणा त्याची जाणीव नसुन अशा लोकांणी परत स्वगृही येऊन शिवसेनेत सामील झाले पाहीजे असे सांगीतले.

तर माजी खासदार आढळराव पाटील यांणी उपस्थित शिवसैनिकांणा सांगीतले राज्यात जरी महाआघाडी असली तरी येणा-या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे तरी सर्वांनी तयारी लागा असे सांगीतले.तसेच गेल्या दोन वर्षात दहा ते बारा कोटी रूपयांचा निधी या मतदार संघात विवीध कामांसाठी दिलेला आहे.तर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्न करत असुन वेळोवेळी कायदा आणि न्याय विभागाला सुचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा: पुरंदरला चांबळीच्या 'कडजाई देवराई' प्रकल्पात वाढतायेत 4,000 झाडे

माजी आमदार सोनवणे म्हणाले की कोरोणाच्या काळात संपुर्ण भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्टाचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांणी उत्तम कामगीरी केल्याबद्दल ते पहील्या पाच मुख्यमंत्र्यांच्या सर्वोच्छ स्थाणी आहे याचा आपल्या सर्व शिवसैनिकांणा अभिमान आहे .तसेच जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणुन जाहीर झाला असुन या ठिकाणी बिबट सफारी केंद्र तसेच दा-या घाटाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी राज्याचे पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या कडे करण्यात आली आहे.तसेच लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे उत्तम काम असुन देखील एका अभिनेत्यासमोर एक उत्तम नेत्याला पराभावाला जावे लागले. आपल्या भांडणाने समोरच्याचा फायदा होतो असे बोलून जी माणसे समाजात वावरत नाही ज्यांचे मोबाईल चोवीस तास बंद असतात ते पुण्या-मुंबईला जाऊन रहातात आणि फिरायला जुन्नर तालुक्यात येतात अशा लोकप्रतिनिधीना घरचा रस्ता दाखवा असे शिवसैनिकांना विद्यमान आमदार यांचे नाव न घेता चिमटा घेऊन आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप चाळक यांणी केले तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांणी केले.

loading image
go to top