दूरदर्शनवरील मालिका पाहण्याचा ‘युजीसी’चा आग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doordarshan

केंद्र सरकारच्या वतीने देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दूरदर्शनवरील मालिका पाहण्याचा ‘युजीसी’चा आग्रह

पुणे - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दूरदर्शनमार्फत निर्मित करण्यात आलेली ‘स्वराज्य : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका पाहावी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये मालिकेवर आधारित प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांना दिली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने दूरदर्शनने ‘स्वराज: भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ या ७५ भागांच्या भव्य मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी झालेल्या स्वातंत्र्य संग्रमापर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. यात प्रामुख्याने आतापर्यंत प्रकाश झोतात न आलेल्या नायकांच्या कथा मांडण्यात आल्या आहेत. देशाच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासह पुढील पिढ्यांपर्यंत ही माहिती पोचविण्यासाठी उद्देशाने मालिकेची निर्मिती केली आहे, असे आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासमवेत ही मालिका पाहावी, यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वराज्य’ या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा आयोजित करण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे. राष्ट्रीय चळवळीत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी हा उपक्रम करण्यास सूचित केले आहे. एकीकडे इंटरनेटद्वारे मालिका पाहण्याचा ट्रेंड गावोगावी रुजत असतानाच देशातील नागरिकांना पुन्हा ‘डीडी’ वरील कार्यक्रमांकडे वळविण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.

Web Title: Ugc Insists On Watching Serials On Doordarshan Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..