पुणे : कोविडवरील संशोधनाबाबत यूजीसीचे मोठे पाऊल; काय आहे वाचा सविस्तर 

ucgc.jpg
ucgc.jpg

पुणे : देशातील अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था 'कोरोना'चा प्रतिबंध करण्यासाठी संशोधन करत आहेत. हे सर्व संशोधन एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, संदर्भ म्हणून त्याचा वापर करता यावा यासाठी 'कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम' हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यावर सर्व विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी त्यांचे संशोधन पाठवण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केले आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटी खरगपुरने कोरोनावरील संशोधन एकत्र करण्यासाठी सुरु केलेल्या 'कोरोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम' या प्लॅटफॉर्मवर कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरी म्हणजेच विशेष संग्रहालय सुरु केले आहे. या संग्रहालयामध्ये देशविदेशातील तज्ज्ञाची प्रकाशने, अहवाल, व्हिडीओ, जर्नल्स, कॉन्फरन्स आणि आयडिया कॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही व्यक्तीला आपले संशोधन या प्लॅटफॉर्मसाठी देता येणार आहे. 

विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना देशात विस्कळीत स्वरूपात असलेले हे संशोधन एकाच जागेवर व एकाच क्लिकवर मिळावे यासाठी देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठांशी संलग्न कॉलेजचे प्राचार्य यांनी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, कर्मचारी यांनी केलेले संशोधन संस्थेच्या मेल, संकेतस्थळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड-१९ रिसर्च रिसोर्स रिपॉझिटरीकडे पाठवण्याची विनंती मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकाव्दारे दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com