Ujni Boat Accident: उजनी धरणातील 6 मृतदेह सापडले, नातेवाईकांचा एकच आक्रोश

Ujni Boat Accident: उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवार (ता.21) रोजी प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील सहा प्रवाशी बेपत्ता होते.
Ujni Boat Accident
Ujni Boat Accidentesakal

Ujni Boat Accident:

उजनी धरणातील 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल आहेत. मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान गौरव डोंगरे यांचा मृतदेह अजून सापडला नाही.

उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवार (ता.21) रोजी प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेले 6 सहा प्रवाशांपैकी 6 प्रवाशांचे मृतदेह तब्बल 46 तासानंतर नैसर्गिकरित्या पाण्यावर तरंगत वर आले असून अद्यापही एक जण बेपत्ता आहेत. दरम्यान मृतदेहाबाबत माहिती मिळतात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

मंगळवार (ता.21) रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे गावात राहणारे गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे) त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव (वय 25वर्षे ) लहान मुलगा समर्थ गोकुळ जाधव (वय दिड वर्ष), मुलगी वैभवी गोकुळ  जाधव (वय 3) हे संपूर्ण कुटुंब तसेच सोलापूर येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचे पुत्र गौरव धनंजय डोंगरे (वय 24) व बोट चालक अनुराग अवघडे (वय 26) असे सात जण कुगाव वरून कळाशी  कडे निघाले प्रवास करीत बोट नदीपात्रातील ऐतिहासिक इनामदार वाड्याच्या परिसरात आले असताना अचानक सुटलेला जोरदार वादळाचा तडाखा आणि वळवाचा तुरळ पाऊस यामध्ये ही बोट उलटली. 

Ujni Boat Accident
पोर्शे अपघातानंतर धक्कादायक घटना समोर; दोघांना कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला 6 महिन्यांनी अटक

यावेळी पोलीस अधिकारी असलेले राहुल डोंगरे हे पोहत तळाशीच्या दिशेने आले. इतर तीन पुरुष एक महिला व दोन बालके असे सहा जण बेपत्ता झाले होते. घटना घडल्यानंतर काही वेळ तसेच बुधवारी संपूर्ण दिवस एनडीआरएफचे पथक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिक यांनी दिवसभर जलाशय पात्रामध्ये शोध घेतला मात्र काहीच हाती लागले नव्हते. त्यानंतर सायंकाळी वारा सुटल्याने तसेच अंधार पडू लागल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. ती आज गुरुवारी पुन्हा सुरू करण्यात आली. 

दरम्यान घटनेला 46 पासून अधिकचा कालखंड उलटलेला असल्याने इनामदार वाड्याच्या परिसरातच या सहा बेपत्ता प्रवाशांपैकी पाच प्रवासी यामध्ये दोन पुरुष एक महिला व दोन बालके यांचे  मृतदेह पाण्यावर नैसर्गिकरित्या तरंगतवर आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ एनडीआरएफच्या जवानांनी तिकडे कुच करत मृतदेह ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान मृतदेह 46 तासापेक्षा जास्त काळ पाण्यात असल्याने त्यांची लगेच ओळख पटवणे शक्य नसल्याने नक्की कोण बेपत्ता आहे हे सध्या तरी समजू शकले नाही. 

Ujni Boat Accident
Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com