उजनीच्या मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला

Ujani-Water
Ujani-Water

वालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्यामुळे उजनीच्या मृत साठ्यातील पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला जाणार आहे. ही इंदापूर तालुक्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत नीरा नदीमधून उजनी धरणामध्ये ७ टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी उजनी जलाशयातून मराठवाड्याला नेण्यासाठी उजनी जलाशय ते सीना कोळेगाव (जेऊर) दरम्यान २७ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात येत आहे. या बोगद्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी ठेवण्यात येणार आहे. उजनीची पाणी वापरण्याची पातळी ४९१ मीटर आहे. मात्र जेऊरच्या बोगद्याची पातळी ४८७ मीटर ठेवण्यात येणार असल्याने मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला जाणार आहे. भविष्यात सात टीएमसीपेक्षा जास्त पाणी मराठवाड्याला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका 
या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले, की नीरा-भीमा खोऱ्याचा तुटीच्या खोऱ्यात समावेश आहे. तुटीच्या खोऱ्यातून पाणी नेण्यास परवानगी नसतानाही उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याचा घाट राज्य सरकार घालत आहे. जेऊरच्या बोगद्याची पातळी चार मीटरने कमी ठेवण्यात येणार असल्याने मृत साठ्यातील पाणी मराठवाड्याला जाणार आहे. त्याचा परिणाम उजनी परिसरातील शेतीवर होण्याची शक्‍यता असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com