कुठे काय बोलावे अन् काय बोलू नये, यासाठी पक्षाने शिबिर घ्यावे : उल्हास पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

''उमेदवार कोणी का असेना, पण त्यांचे काम करा. कुठे काय बोलावे आणि काय बोलू नये, यासाठी पक्षाने शिबिर घेतले पाहिजे, अशी गरज व्यक्त करून पवार म्हणाले," लढण्याऐवजी वेगळा विचार करण्याचीही वेळ नाही. वेगळ्या राहूट्यात न राहता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

पुणे : " एकमेकांच्या विरोधात लढण्याची आणि काड्या करण्याची ही वेळ नाही. काँग्रेसमुळे तुमची ओळख निर्माण झाली आहे. तेव्हा उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता कामाला लागा,' अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांनी कानउघाडणी केली. 

कसबा विधानसभा मतदार संघातील पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अजित दरेकर, रवींद्र धंगेकर, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, नीता परदेशी आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते महेश वाघ यांनी " कसबा विधानसभा मतदार संघात बाहेर कोणत्याही उमेदवाराला पक्षाने उमेदवारी देऊ नये. स्थानिकच उमेदवार द्यावा,' असा ठराव मांडला. त्यावर पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. 
 
 ''उमेदवार कोणी का असेना, पण त्यांचे काम करा. कुठे काय बोलावे आणि काय बोलू नये, यासाठी पक्षाने शिबिर घेतले पाहिजे, अशी गरज व्यक्त करून पवार म्हणाले," लढण्याऐवजी वेगळा विचार करण्याचीही वेळ नाही. वेगळ्या राहूट्यात न राहता एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. माझ्याबरोबरच आणि माझ्या हाताखाली पक्षात काम केलेले अनेक मंत्री झाले, खासदार, आमदार झाले. म्हणून पक्षाने मला संधी दिली नाही, असे सांगून मी रडत नाही बसलो. झाले ते गेले, तेच उगळण्यात काय अर्थ नाही.'' यावेळी बागवे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.

''बाळासाहेब आणि मोहनदादा तुमची गिरीश बापट यांच्याबरोबरची मैत्री सर्वांना माहिती आहे. ती मैत्री आता घरी ठेवा. राजकारणात ती आणू नका. त्यामुळे पक्षावर ही वेळ आली'', असा थेट सल्ला बालगुडे यांनी दिला. अजित पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवार जाहीर करू नयेत, असेही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhas Pawar demands training sessions for public behavior to party workers