Wagholi News : मिळकतीवर बोजा चढवून अनधिकृत जाहिरात फलक कारवाई खर्च करणार वसूल

खराडीतील पाच व वाघोलीतील सहा अनधिकृत जाहिरात फलकावर महापालिकेने केली कारवाई.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

वाघोली - खराडीतील पाच व वाघोलीतील सहा अनधिकृत जाहिरात फलकावर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईचा निष्कासन खर्च संबंधित जाहिरातदार / संस्थेकडून वसूल केला जातो. मात्र तो त्यांनी मुदतीत न भरल्याने हा खर्च त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवून वसूल करण्यात येणार आहे. सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांची ही रक्कम आहे. त्यात आठ जणांचा समावेश आहे.

प्रत्येक अनधिकृत फलकाचा कारवाई खर्च नऊ लाख 38 हजार रुपये आहे. त्यात आठ मिळकतदारांचा समावेश आहे. त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवून महापलिका वसूल करणार आहे. परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारवाई झाल्यानंतर सदरचा कारवाई खर्च संबंधित अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था/व्यक्तींकडून वसूल केला जातो.

सदरचा निष्कासन कारवाई खर्च जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था/व्यक्तीने विहित मुदतीत न भरल्यास सदर कारवाईचा खर्च संबंधित जाहिरात फलक अभिकरणाकडून वसूल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सदर वसुली करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यानुसार ही वसूल केली जाणार आहे.

त्याबाबतचे पत्र कर आकारणी व कर संकलन प्रमुख तथा उपायुक्तांना देण्यात आले आहे. ही रक्कम वसूल झाल्यावर ती परवाना व आकाश चिन्ह विभागाला देण्यात येणार आहे. तशी मान्यता कर आकारणी व कर संकलन विभागाने दिली आहे. वाघोलीतील दोन माजी उपसरपंच यांच्या मालकीचे अनाधिकृत फ्लेक्स होते.

एका माजी उपसरपंच यांच्याकडून एका फलकाचा तर दुसरे माजी उपसरपंच यांच्याकडून तीन अनधिकृत फलकाचा खर्च वसूल करण्यात येणार आहे. तर अन्य एक व्यावसायिक यांच्याकडून दोन फलकांचा खर्च वसूल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com