अनधिकृतरीत्या गॅस सिलेंडरमध्ये भरुन काळ्या बाजाराने विक्री; एकास अटक

टेम्पोमधील सिलेंडर उतरवुन त्यामधील गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये अनधिकृतरीत्या भरुन त्याची काळ्या बाजाराने विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला.
Cylinder gas theft
Cylinder gas theftsakal
Summary

टेम्पोमधील सिलेंडर उतरवुन त्यामधील गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये अनधिकृतरीत्या भरुन त्याची काळ्या बाजाराने विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला.

पुणे - टेम्पोमधील सिलेंडर उतरवुन त्यामधील गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये अनधिकृतरीत्या भरुन त्याची काळ्या बाजाराने विक्री करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने एकास अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तुषार ज्ञानदेव चांदगुडे (वय 27, रा. सुपा, बारामती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जीवनावश्‍यक वस्तु कायद्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाकडून गॅस सिलेंडरमधील गॅस काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी दारुवाला पुल येथील गुरुसिंग गुरुद्वारा पार्कींग येथे एक व्यक्ती टेम्पोमध्ये भरलेले सिलेंडर उतरवुन रिकाम्या सिलेंडरमध्ये नळीद्वारे अनधिकृतरीत्या भरीत (पल्टिसिलेंडर) आहे, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी एक व्यक्ती भरलेल्या सिलेंडरमधील गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानुसार, पोलिसांनी तुषार चांदगुडे यास ताब्यात घेतले. तेथे थांबलेल्या टेम्पोची पाहणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये ठेवलेल्या 15 सिलेंडरपैकी भारत गॅस कंपनीचे 19 लिटरचे प्रत्येकी चार सिलेंडर भरलेले व 11 रिकामे सिलेंडर मिळून आले.तसेच एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार स्टीलच्या नळ्या असा एकूण 37 हजार 500 रुपये माल व दोन लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलिस कर्मचारी किशोर वग्गु, साधना ताम्हाणे, चेतन गोरे, गजानन सोनुने, मितेश चोरमोले यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com