
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : पुणे -सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या थेऊर फाटा येथील उड्डाणपूल हा अवजड वाहनाचे बेकायदेशीर 'वाहनतळ' बनले आहे. धोकादायकरीत्या थांबलेल्या अवजड वाहनांमुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अवजड वाहनांवर लोणी काळभोर पोलिस कारवाई कधी करणार हा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.