कात्रज तलाव आहे की दुर्गंधीचे साम्राज्य, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा पाण्यावर तवंग, आरोग्यास धोका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

सध्या तलावात पाणी असून प्लॅस्टिकचा कचरा बाजूला पाण्यामध्ये तरंगत आहे. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि निर्माल्य यांचा समावेश आहे. यामुळे जलचरांना धोकाही निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे हिरवट रंगाचे पाणी तयार झाल्याचे दिसते. त्यामुळे मच्छर आणि डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलावातील पाण्याचा आता उग्र वास येऊ लागला आहे. त्यामुळे आजूबाजंच्या सोसायट्यांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  

कात्रज (ता. १९) : नानासाहेब पेशवे तलाव कात्रज परिसरातील पर्यटन स्थळ आहे. मात्र, सध्या तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून तलावाच्या पाण्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा तवंग पसरला आहे. तलावाची कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात येत नाही. पाण्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून रिकाम्या बाटल्या फेकून दिल्याचे चित्र आहे. 

सध्या तलावात पाणी असून प्लॅस्टिकचा कचरा बाजूला पाण्यामध्ये तरंगत आहे. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि निर्माल्य यांचा समावेश आहे. यामुळे जलचरांना धोकाही निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे हिरवट रंगाचे पाणी तयार झाल्याचे दिसते. त्यामुळे मच्छर आणि डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलावातील पाण्याचा आता उग्र वास येऊ लागला आहे. त्यामुळे आजूबाजंच्या सोसायट्यांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

सातत्याने अशाप्रकारे तलावात कचरा साचल्याचे निदर्शनास येत आहे. २४ तास रहदारी असलेल्या बाजूच्या रस्त्यावरून लोक ये-जा करत असताना नागरिक तलावात कचरा फेकतात. तेथे सूचनांचे फलक लावलेले असतानाही त्या सूचनांचे कोणीही पालन नाही. त्यामुळे पाणी खराब होत आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील ड्रेनेजलाईचे पाणी ओढ्यात सोडले असल्याने दुर्दशा झाली आहे. तलावाची निगा राखण्याचे काम होत नसल्याने ही दुर्दशा झाली आहे.

तलावातील दुर्गंधीने मच्छर आणि डासांचे प्रमाण या भागात वाढले असून याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनीधींनी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आमचे आरोग्यास धोका निर्माण झाला असून महापालिका याची जबाबदारी घेणार नसेल तर करसंकलन कशासाठी होते असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिकेने एवढा मोठा निधी खर्च करूनही ज्या पद्धतीने तलावाची निगा राखणे आवश्यक आहे, त्या पद्धतीने निगा राखताना प्रशासन दिसत नाही
- अरविंद मोरे, स्थानिक नागरिक

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत हद्दीत ड्रेनेज लाईन जोडण्यात आलेल्या नसून ड्रेनेजचे पाणी थेट ओढ्यात सोडण्यात आले आहे. ड्रेनेजचे पाणी ओढ्यात सोडल्यानेच तलावाची दुर्दशा झाली आहे. याबाबती सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरु आहे.
- योगेश ताम्हाणे, प्रभारी उद्यान निरीक्षक 

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncleanliness in Katraj Lake cause Health Issues for citizen