'हायब्रीड अँन्युइटी' योजनेमधून राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन

'हायब्रीड अँन्युइटी' योजनेमधून राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन

खडकवासला : मतदार संघातील मुख्य रस्ते रुंद व मजबूत करताना त्यातून ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळावी. हा हेतू माझ्याकडे मांडून त्यातून तीन कामांची निविदा काढून सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा निधी मिळविला. 'हायब्रीड अँन्युइटी' योजनेमधून राज्यातून पहिल्या कामाचे भूमिपूजन करून घेण्यास आमदार भीमराव तापकीर यांच्या चिकाटी वृत्तीमुळे ते यशस्वी झाले आहेत, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

खडकवासला मतदार संघातील खेड शिवापूर- कोंढणपूर, नांदेड, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक डोणजे खानापूर मार्गे वेल्हे, खानापूर ते पानशेत या तीन  रस्त्यांच्या कामाला 202 कोटी रुपयांचा कामाचे भूमिपूजन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते खडकवासला किरकटवाडी येथे झाले. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते, जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर, पंचायत समिती सदस्य फुलाबाई कदम, अनिरुद्ध यादव, मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे हे प्रमुख मंडळी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "पुणे शहर हद्दीलगतचा परिसर असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते अरुंद होत आहे. म्हणून रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीसाठी जास्तीचा निधी या रस्त्याला दिला आहे. 10 वर्षांची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे आहे." 
मतदारसंघातील नागरिकांच्या कामासाठी मी अनेक मंत्र्यांकडे जाऊन पाठपुरावा करून जास्तीचा निधी मिळविला आहे. रस्ते, शेततळी या सारख्या अनेक योजना राबविल्या . असे सांगून आमदार तापकीर म्हणाले, मागील 15 वर्षात जिल्हा परिषद, राज्य सरकार व केंद्र सरकार तुमचे असताना या मतदार संघातील रस्त्यांची कामे का केली नाहीत. आता रस्त्याला निधी मंजूर झाल्यावर रस्त्यात भट लावणीचे आंदोलन घेतले. असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लगावला. कोणी किती ही सांगितले तरी किरकटवाडी ते नांदोशी व बहुली ते जांभली रस्त्याला निधीची मागणी त्यांनी बांधकाम मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे केली. 

युवा मोर्च्याचे अध्यक्ष सचिन मोरे, महिला आघाडीच्या अश्विनी खाटपे, ब्लॉक अध्यक्ष अभिजित धावडे, नगरसेवक हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, प्रसन्न जगताप, किरण दगडे, राजेंद्र शिळीमकर, दिलीप वेडेपाटील, नगरसेविका वर्षा तापकीर, राजश्री नवले, नीता दांगट, मंजुश्री नागपुरे, अल्पना वर्पे, वृषाली चौधरी, सचिन दांगट, शहाजी वांजळे, सुभाष नाणेकर, उमेश सरपाटील, बाळासाहेब नवले, वासुदेव भोसले, राधेश्याम शर्मा, बापू पासलकर, किरण बारटक्के, किरण हगवणे, अनिल मते, उपसरपंच महेश हगवणे, अरुण दांगट, किशोर पोकळे, काजल हगवणे, पल्लवी रिंढे, रेखा सोनवणे, रुपेश घुले, सुजित कारले उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com