अंगाची मालिश करून घेणे वृद्धाला पडले महागात ! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

संबंधीत वृद्ध व्यक्ती या भारती विद्यापीठ परिसरामध्ये राहतात. ते दररोज तेथील इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसरात बसतात. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन बसले. त्यावेळी तेथे तोंडाला रुमाल बांधलेला, पांढार शर्ट व काळी पॅंट परिधान केलेला एक 40 वर्ष वयाची व्यक्ती वृद्ध नागरीकाजवळ आली. त्याने फिर्यादी यांना त्यांच्या शरीराची चांगली मालीश करून देतो, असे सांगून त्यांचा विश्‍वास प्राप्त केला.

पुणे : नेहमीप्रमाणे एक वृद्ध व्यक्ती रात्री जेवण झाल्यानंतर जवळच्याच मंदिरात बसले. त्याचवेळी तेथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने वृद्धाला त्यांच्या शरीराची चांगल्या प्रकारे मालिश करुन देतो असे सांगितले. वृद्धानेही त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि पुढच्या काही मिनीटातच त्या व्यक्तीने मालिशचा बहाणा करुन वृद्धाच्या नकळत त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी काढून घेतली. ही घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. 

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

याप्रकरणी 76 वर्षीय वृद्ध नागरीकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत वृद्ध व्यक्ती या भारती विद्यापीठ परिसरामध्ये राहतात. ते दररोज तेथील इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसरात बसतात. नेहमीप्रमाणे ते गुरूवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन बसले. त्यावेळी तेथे तोंडाला रुमाल बांधलेला, पांढार शर्ट व काळी पॅंट परिधान केलेला एक 40 वर्ष वयाची व्यक्ती वृद्ध नागरीकाजवळ आली. त्याने फिर्यादी यांना त्यांच्या शरीराची चांगली मालीश करून देतो, असे सांगून त्यांचा विश्‍वास प्राप्त केला.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

त्यानंतर संबंधीत व्यक्तीने वृद्धाच्या शरीराची मालिश करण्याचा बहाणा केला. वृद्ध नागरीकाने गळ्यात घातलेली 70 हजार रुपयांची सोनसाखळी त्यांची नजर चुकवून खिशात घातली. त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पोबारा केला. दरम्यान, काही वेळाने आपल्या गळ्यातील सोनसारळी चोरीला गेल्याचे वृद्धाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी संबंधीत व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्हि.व्ही. डिगे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the pretext of massaging the thief snatched the gold chain of old man in pune