
भुयारी मेट्रोने मुठा नदी ओलांडली !
पुणे : पिंपरी, चिंचवड-स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्यात रेंजहिल्स (कृषी महाविद्यालय मैदान) ते स्वारगेट दरम्यान ६ किलोमीटरचा मार्ग भुयारी असेल. या भुयारी मार्गाच्या खोदाईचे काम शिवाजीनगर न्यायालयाजवळ मुठा नदीच्या पात्रातून पूर्ण झाले आहे. नदी ओलांडून आता ही खोदाई फडके हौद स्थानकाच्या दिशेने सुरू झाली आहे.
हेही वाचा: म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास एक महिना मुदतवाढ
- मुठा नदीपात्राची लांबी १२० मीटर
- न्यायालयापासून झालेली खोदाई २०० मीटर
- फडके हौद स्थानक ते स्वारगेट दरम्यान खोदाई पूर्ण होणार ६ महिन्यांत
- नदीपासून खोलवर खोदाई १८ मीटर
- जमिनीपासून खोलवर खोदाई २८ मीटर
- भुयाराचा परीघ - ६. ४ मीटर
- रेंजहिल्सपासून कसबा पेठेपर्यंत तयार झालेली भुयारी मार्ग १. ८ किलोमीटर
- स्वारगेटपासून मंडईच्या दिशेने झालेली खोदाई - २५० मीटर
- टनेल बोअरींग मशिनचा खोदाईचा वेग - २४ तासांत १० मीटर
- भुयारी मेट्रोसाठी खोदाई करण्यासाठी - ३ टनेल बोअरिंग मशिन, मनुष्यबळ ६० कामगार
हेही वाचा: गुन्हेगारी नियंत्रणास प्राधान्य : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
पुण्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Web Title: Underground Metro Crosses Mutha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..