Mon, March 27, 2023

Pune : उंड्रीतील जि.प. शाळेत योग अभ्यासवर्ग सुरू
Published on : 2 December 2022, 6:26 am
उंड्री : स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्था बंगलूर यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उंड्रीतील शाळेमध्ये योग अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला आहे. योगशिक्षिका पूनम भारती दररोज सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत आहेत.
सूर्यनमस्कार, कपालभाती, सूक्ष्म व्यायाम असे योगाचे प्रकार करून घेतले जात असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. योग अभ्यास वर्गाचा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत होत आहे, मुख्याध्यापिका सुरेखा माटे यांनी सांगितले.
याप्रसंगी शिक्षक राजेंद्र कुंभारकर, संजय खोपडे, सुवूता खोपडे, आरती ठाकरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते