Education News: सिंबायोसिस अभियांत्रिकी परीक्षेत ‘रेबॅन मेटा’ चष्म्याचा वापर; दोन विद्यार्थी प्रतिबंधित

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सिंबायोसिस अभियांत्रिकी परीक्षेत ‘रेबॅन मेटा’ चष्म्याचा वापर; विद्यार्थ्यांना तत्काळ प्रतिबंधित करून गैरप्रकार समितीकडून चौकशी सुरू
High-Tech Cheating at Symbiosis: Students Caught Using Ray-Ban Meta Smart Glasses

High-Tech Cheating at Symbiosis: Students Caught Using Ray-Ban Meta Smart Glasses

Sakal

Updated on

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’ पेपरफुटीचा कसून तपास सुरू असतानाच सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थ्यांनी कॅमेरा असलेला अत्याधुनिक चष्म्याचा वापर केल्याचे दिसून आले. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेपासून प्रतिबंधित केले असून या प्रकरणाची संस्थेच्या परीक्षेतील गैरप्रकार समितीमार्फत (अनफेअर मीन्स कमिटी) चौकशी करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com