Budget 2021: संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी फायदा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी, तसेच तज्ज्ञांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविली आहे.संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी या अर्थसंकल्पाचा नक्की मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली

पुणे  - संरक्षण क्षेत्रासाठी जाहीर तरतुदीचे स्वागत करत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी, तसेच तज्ज्ञांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविली आहे. संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी या अर्थसंकल्पाचा नक्की मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली. 

दत्तात्रेय शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) - संरक्षणासाठी चार लाख ७८ हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात थोडीशी वाढ झाली आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजेच शत्रू देशासमोर भारताची संरक्षण सिद्धता दाखविण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. तसेच निवृत्ती वेतनाचा खर्च कमी करण्यात आला आहे. तर वाढविण्यात आलेल्या पैशांचा वापर हा आधुनिकीकरणासाठी केला जाईल. 

हे वाचा - Defence Budget 2021: संरक्षण क्षेत्रात भरीव तरतूद; राजनाथ सिंहांनी मानले मोदींचे आभार

हेमंत महाजन, ब्रिगेडिअर (निवृत्त) -  गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण तरतुदीत वाढ वाढ झाली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यंदा आधुनिकीकरणासाठी एक लाख ३५ हजार कोटींचा खर्च देण्यात येणार आहे. तर खर्चात गेल्या वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी नक्कीच वेग मिळेल. 

शशिकांत पित्रे, मेजर जनरल (निवृत्त) -  लष्करासाठी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सध्या जवळपास २५ हजार कोटी जास्त असल्याचे समजते. तर आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत नवनवीन शस्त्रप्रणाली आणि यंत्रणेचा विकास करण्यासाठी जास्त निधी लागू शकतो. पूर्व लडाख सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठीचा खर्च देखिल गेल्या वर्षी वाढला. यापूर्वी या सीमेवर इतका तणाव नव्हता.

Budget 2021: कुणाला दिलासा, कुणाला निराशा; बजेटसंबंधी 10 महत्त्वाच्या बातम्या...

नितीन गोखले, संरक्षण विश्‍लेषक -  नवीन शस्त्रांच्या खरेदीसाठी हा अर्थसंकल्प वाढविण्यात आला आहे. तर १८ हजार कोटी रुपयांनी सेवानिवृत्ती वेतनबिल कमी झाले आहे. गेल्या वर्षाच्या बजेटनुसार नवीन खरेदीसाठी एक लाख १३ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले होते. तर यामध्ये आणखीन वीस हजार कोटी जास्त खर्च झाले होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की संरक्षण क्षेत्रात आता संपूर्ण निधीचा वापर केला जात आहे. इतकच नाही तर त्याच्यावरती लागणारा खर्च देखील पुरविण्यात येत आहे.

Budget 2021: कुणाला दिलासा, कुणाला निराशा; बजेटसंबंधी 10 महत्त्वाच्या बातम्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget updates defense sector Retired military officers experts reported positive feedback