Union Minister Nitin Gadkari: Water management can empower farmers to contribute as energy providers.
पुणे : ‘‘देशात पाण्याची कमी नाही, मात्र कमी आहे ती नियोजनाची. हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, शास्त्रोक्त जलसंधारणाची कामे आणि स्किलचा वापर केल्यास शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता, हायड्रोजनदाता बनेल,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला. भाषणे देणारे या देशात खूप आहेत, परंतु स्वतः केले आणि नंतर लोकांना सांगितले अशांची संख्या कमी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.