Pune traffic : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेलांना पुण्यातील वाहतुकीचा फटका

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना आज शुक्रवारी पुण्यातील नऱ्हे येथील पार्टीच्या बैठकीला जाताना येताना वाहतुकीचा फटका बसला
pune traffic
pune trafficsakal

खडकवासला : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना आज शुक्रवारी पुण्यातील नऱ्हे येथील पार्टीच्या बैठकीला जाताना येताना वाहतुकीचा फटका बसला.

पारी कंपनी चौक- श्री कंट्रोल- एस.के. बँक्वेट हॉल या अर्धा किलोमीटर परिसरात रोज वाहतूक कोंडी असते. आज देखील तीच परिस्थिती होती. मंत्री महोदयांच्या दौरा १० वाजता पोचला. त्यावेळी, नऱ्हे या औद्योगिक क्षेत्र असल्याने या परिसरातील कंपनीत येणारा कामगार वर्ग, शहराच्या वेगवेगळ्या भागात जाणारे कामासाठी जाणारे नागरिक यामुळे रस्त्यावर गर्दी होती.

येथील चार- पाच मोठी शैक्षणिक संकुल आहेत. नऱ्हे परिसरातील वाहतुकीच्या मानाने असणारे रस्ते अरुंद आहेत. जड वाहनांची वाहतूक, रस्त्यावर असलेले अतिक्रमण फलक, अशा प्रकारे जाणारे- येणारे विद्यार्थी व कामगार वर्ग यामुळे वाहतूक कोंडी होत असते. आजच्या या दौऱ्यामुळे सिंहगड रोड वाहतूक पोलिसांची व ग्रामीण पोलिसांची धावपळ उडाली होती.

मंत्रीमहोदय खडकवासला येथील केंद्रीय जल आयोगाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते. तेथून ते नऱ्हे येथील बँक्वेट हॉल मधील कार्यक्रमास आले होते. तेथून ते नांदेड चव्हाण बाग, धायरी उंबऱ्या गणपती चौक, पारी चौक असा त्यांचा कार्यक्रम ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग होता. जाताना त्यांना धायरी गावातील चौक, पारी कंपनी चौक, श्री कंट्रोल चौक या चौकात गर्दी होती.

मंत्रीमहोदय एस.के. बँक्वेट जवळ पोचताना त्यांच्या ताफ्यातील पायलट वाहनांच्या पुढे तीन- चार कार, डँपर होते. दुसऱ्या बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक चौकात पोलीस होते. ते वाहतुक नियोजन करीत होते. परंतु या परिसरात आज देखील नेहमी असणारी वाहतूक कोंडी, जड वाहतूक ही सुरू होती. परिणामी या दौऱ्यामुळे अधिक वाहतूक दिसत होती. दहा वाजता सुरू झालेली बैठक बारा वाजता संपली त्यानंतर मंत्रीमहोदय मुळशीकडे गेली. नऱ्हे येथील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी दररोज असते. हे गाव गेल्यावर्षी महापालिकेत आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे रस्ते रुंद झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com