
देशातील युवक-युवतींचा फिटनेस वाढविण्यासाठी आता केंद्रीय खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या नेहरु युवा केंद्राने पुढाकार घेतला आहे. यासाठी फिट इंडिया मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या स्वातंत्र्यादिनी (ता. १५ ) केली जाणार आहे.
पुणे - देशातील युवक-युवतींचा फिटनेस वाढविण्यासाठी आता केंद्रीय खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या नेहरु युवा केंद्राने पुढाकार घेतला आहे. यासाठी फिट इंडिया मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या स्वातंत्र्यादिनी (ता. १५ ) केली जाणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, पुणे जिल्हा नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे या केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी शुक्रवारी सांगितले.
केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या मोहिमेचे ऑनलाइन पद्धतीने उद्घघाटन करण्यात येणार आहे.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!
सध्याची तरुण पिढी ही मोबाईल, संगणक यामध्येच व्यस्त झाली आहे. यामुळे युवक-युवती दिवसेंदिवस मैदानी आणि अंग कसरतीचे खेळ विसरत चालले आहेत. या चुकीच्या जीवनशैलीमुळेच तरुणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार वाढत आहेत. या जीवनशैलीत बदल केल्यास हे गंभीर आजार दूर करण्यास आणि पर्यायाने सशक्त भारताचा पाय रचण्यास फायदा होईल, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे मानखेडकर यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्हे घटले पण...; काय सांगतो पुणे पोलिसांचा रिपोर्ट
यावर्षी देशातील सुमारे १ लाख खेड्यांपर्यंत ही मोहिम पोहोचविण्याचा पोहचविण्याचा सरकारचा मानस आहे. ही १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहून केल्या जाणाऱ्या कवायती, योगा, व्यायामाची सवय लावण्यावर भर दिला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभागी होत देशाला सशक्त करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन यशवंत मानखेडकर यांनी केले आहे.
Edited By - Prashant Patil