Pune News : राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे अनोखा उपक्रम ; बालक पालक वाचन मंदिराचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी मी साक्षर माझा पालक साक्षर हा अनोखा उपक्रम राबवला असून या उपक्रमाचे परिसरात कौतुक होते आहे.
Pune News
Pune Newsesakal

Pune News - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने,शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर आंबेगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मी साक्षर माझा पालक साक्षर हा अनोखा उपक्रम राबवला असून या उपक्रमाचे परिसरात कौतुक होते आहे.

नुकतेच बालक-पालक वाचन मंदिर ग्रंथालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.व्ही.एस.अंकलकोटे पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी ग्रंथालयास संस्थापकांच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट दिला.

Pune News
Sakal Special News : कौटुंबिक अत्याचार, प्रेम, फसवणुकीतून 116 महिलांना वाचविले

वाचन मंदिर ग्रंथालयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अंकलकोटे पाटील म्हणाले  'विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तसेच पालकांमध्येही वाचन संस्कृती रुजावी या उदात्त हेतूने 'बालक-पालक वाचन मंदिर' उपक्रम सुरू केला आहे. तसेच या वाचनालयाचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांच्या मार्फत केले जाणार असून, विद्यार्थी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ग्रंथालयास पुस्तक देखील भेट देणार आहेत.असा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच आमच्या संस्थेत होतो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.

Pune News
Sakal Impact News : ..अखेर ‘त्या’ जुन्या वसाहतीवर हातोडा; आमदार अनिल पाटील यांच्या उपोषणाला यश

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.सौरभ अंकलकोटे पाटील,संस्थेचे संचालक उत्तम चव्हाण,शाळेच्या मुख्याध्यापिका मिनल साने,कार्यक्रमाच्या संयोजिका श्रीदेवी अलुरे,तसेच शाळेतील शिक्षकेतर वर्ग पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची  विद्यार्थिनी सई यादव हिने केले तर आभार अमृता शेळके हिने मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com