पुण्यातील या कोविड केअर केंद्रात साजरे झाले अनोखे रक्षाबंधन

इंदापूर - कोरोनाबाधीत रुग्णांना राखी बांधताना कोरोना योध्या महिला शासकीय वैद्यकीय अधिकारी.
इंदापूर - कोरोनाबाधीत रुग्णांना राखी बांधताना कोरोना योध्या महिला शासकीय वैद्यकीय अधिकारी.

इंदापूर - भारतीय संस्कृतीत बहिण-भावांच्या रक्षाबंधन सणास अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, कोरोनाबाधीत झाल्यामुळे इंदापूर येथील कोविड केअर केंद्रात अनेक भाऊ या सणा पासून वंचित होते. मात्र या केंद्रातील डॉ. सुजाता खुसपे, डॉ. दिपाली कोकरे तसेच नर्स वृषाली नवगिरे यांनी कोरोना बाधीत रुग्णांना पीपीई किट घालून राख्या बांधल्या. तसेच, त्यांना दीर्घायुष्य चिंतूनत्यांच्या आयुष्याची दोरी बळकट केली. त्यामुळे रुग्णांना आधार मिळाला असून त्यांच्या जगण्याच्या लढाईस बळ मिळाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अभिनव उपक्रमामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ असल्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. येथील विलगीकरण कक्षात कोरोनाचे सर्व जाती धर्माचे शेकडो रुग्ण औषधोपचार घेत आहेत. मागील दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षवेधी वाढ झाली आहे. आपल्या घरापासून दूर विलगीकरण कक्षात दाखल व्हावे लागत असल्याने कोरोना रुग्णांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होतआहे.

रक्षाबंधन सणात बहिणींची इच्छा असूनदेखील त्यांना भावापासून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी तसेच वैद्यकीय सुरक्षेच्याकारणा स्तव त्यांना सण साजरा करणे अशक्यहोते. बहिण भावाच्या नात्यातील ह्या सर्वात पवित्र सणात भावांची मनगटे सुनीसुनी रहाणार, बहिणींचे डोळे आसवांनी भरणार हे चित्रच अस्वस्थ करणारे वाटल्याने या सर्व भावांना राखी बांधण्याचा निर्णय उपरोक्त दोन्हीडॉक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यांना उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी परवानगी दिल्यानंतर कोरोना रुग्णांना राख्या बांधण्यात आल्या.

या रुग्णांना औषध, सेवा, सुश्रुषेबरोबरच बहिणींची माया व दुवा मिळाल्याने त्यांना जगण्याचे नवे बळ मिळाले आहे. हा उपक्रम छोटा आहे, मात्र यामुळे राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म समभाव मजबूत झाला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, पंचायत समिती सभापती पुष्पा रेडके, नगराध्यक्षा अंकिता शहा, तहसिलदार सोनाली रेडके, गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com