विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले, निकाल कसा लावणार....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करावा. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांचा निकाल लावण्यासाठी फिफ्टी फिफ्टीचे सूत्र निश्‍चित केले आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यमापनावर ५० टक्के आणि सत्र परीक्षेतील गुणांवर ५० टक्के श्रेणी मिळणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे निकाल कसा लावावा, हे ठरविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुलगुरूंची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकारने अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांची परीक्षा रद्द केली. ज्यांची परीक्षा रद्द झाली आहे, त्यांचा निकाल सत्र परीक्षेचे गुण व अंतर्गत मूल्यमापनावर लावला जाईल, असे स्पष्ट केले होते. 

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबत परिपत्रक काढले आहे. या सूत्रास विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करावा. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University exam schedule collapses then how to get results