पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शौनक कुलकर्णी यांचे निधन

Dr_Shaunak_Kulkarni_SPPU
Dr_Shaunak_Kulkarni_SPPU

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र (Anthropology) विभागाचे प्रमुख डॉ. शौनक कुलकर्णी (वय ५८) यांचे शनिवारी (ता.८) सकाळी निधन झाले. काही दिवसांपूर्वीच ते 'कोरोना'तून (Coronavirus) बरे झाले होते; परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. 

शौनक कुलकर्णी यांना 'कोरोना'ची लागन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना मधुमेहाचा त्रासही होता. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने कोरोना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने सात दिवसांपूर्वी त्यांना साध्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले. दरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृती बिघडून शनिवारी (ता.८) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

प्रा. शौनक कुलकर्णी हे गेले तीन दशके (१९८५ पासून) पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) मानवशास्त्र विभागात कार्यरत होते. अध्यापनासह संशोधन हा त्यांच्या कामाचा गाभा होता. मानवी जनसमूह आणि त्यांच्या संस्कृती, आदिवासी समाज, निसर्ग आणि जीवनशैली अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केले. त्यासह मराठी, इंग्रजीमध्ये विपुल लिखाण केले. मानवशास्त्र विषयाच्या संस्थात्मक उभारणीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. २०१८ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मानवशास्त्र परिषदेचे आयोजनही विद्यापीठाने यशस्वीपणे केले होते.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, "प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. विद्यापीठाची मोठी हानी झाली आहे. डॉ. कुलकर्णी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना धोका नसल्याचे वाटत होते. मात्र, प्रकृती गुंतागुंतीची झाल्याने त्यांचे निधन झाले."

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, "पुणे विद्यापीठात पुरोगामी विचार आणि नवसंशोधन यासाठी प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व हरपले आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com